अध्यक्ष: श्री. एन. के. सिंग
नेमणूक: २७ नोव्हेंबर २०१७
शिफारस कालावधी: २०२० ते २०२५
सदस्य: शक्तीकांत दास, डॉ. अनुप सिंग, अशोक लाहिरी,
रमेश चांद
सचिव: अरविंद मेहता
योजनेचे स्वरूप
- कालावधी: १ एप्रिल २०२० – ३१ मार्च २०२५
-
उद्देश: ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांचे
बळकटीकरण
-
निधीचे प्रकार: मुलभूत (अनटाईड) व बंधनकारक (टाईड)
- वाटप: ५०% – ५०%
-
गणना: २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या व क्षेत्रफळ
बंधनकारक निधी अंतर्गत कामे
-
स्वच्छता व हगणदारीमुक्त दर्जा राखण्यासाठी सार्वजनिक शौचालय
बांधकाम/दुरुस्ती, बंदिस्त नाली बांधकाम, कंपोस्ट / गांडूळ खत तयार
करणे, गोबर गॅस योजना, शाळा/अंगणवाडीत शौचालय, कचरा संकलनासाठी
घंटागाडी
-
पाणीपुरवठा योजना: नळ पाणीपुरवठा विस्तार व दुरुस्ती,
मोटार/पाईप/विहिरींची दुरुस्ती, आर.ओ. प्लांट बसवणे, टाक्या बांधकाम,
विंधन विहिरी, जनावरांसाठी हौद
-
पावसाचे पाणी संकलन व पुनर्भरण: रुफ वॉटर हार्वेस्टिंग, माती बांध,
शेततळे, गावतळे, सार्वजनिक विहिरींचे पुनर्भरण
अबंधनकारक निधी अंतर्गत कामे
- पेयजल व साठवणूक साधने
- लसीकरण व कुपोषण निर्मूलन
- रस्ते दुरुस्ती व बांधकाम
- सौर/एलईडी दिवे
- स्मशानभूमी व देखभाल
- Wi-Fi सुविधा
- सार्वजनिक वाचनालय, उद्यान, खेळाचे मैदान
- आपत्ती व्यवस्थापन
खर्च करता न येणाऱ्या बाबी
- एकाच योजनेवर दुबार खर्च
- मानधन, पगार, T.A./D.A.
- समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, सजावट